Homeलातूरडॉ. गोपाळराव पाटील यांच्या पार्थिवाचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी घेतले दर्शन

डॉ. गोपाळराव पाटील यांच्या पार्थिवाचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी घेतले दर्शन

लातूर : लातूरचे माजी खासदार तथा शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  डॉ. गोपाळराव पाटील यांचे मंगळवारी सकाळी निधन झाल्याची बातमी कळताच राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी डॉ. गोपाळराव पाटील यांच्या जुना औसा रोडवरील निवासस्थानी जाऊन डॉ. गोपाळराव पाटील यांच्या पार्थिव देहाचे अंतिम दर्शन घेतले त्यांना पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी विनायकराव पाटील कवठेकर, शहाजी पाटील,  सच्चीदानंद पाटील, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे तसेच पाटील कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR