लातूर : प्रतिनिधी
येथील बौद्धनगरमधील वैशाली बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त धम्म ध्वजाचे ध्वजारोहण, बुद्ध वंदना असा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी उपस्थित होते. याप्रसंगी सर्वप्रथम तथागत भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प व पुष्पमाला अर्पण करून धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात येऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, वैशाली बुद्धविहाराचे विश्वस्त सूर्यभान लातूरकर, जगन्नाथ सुरवसे, दामू कोरडे, विवेक शिरसाठ, जयंती उत्सव समितीचे ओमकार शिरसाठ, संजय कांबळे, अॅड. रमक जोगदंड, असितकुमार कांबळे, आनंदा कांबळे, धनराज कांबळे, गौतम चिकाटे, हरिश्चंद्र सुरवसे, महादू गायकवाड, सुनील कांबळे, सविता चिकाटे, लता चिकटे, अनुराधा कांबळे, लता गायकवाड, छाया कांबळे, अंबाबाई घनघावे आदींसह बौद्धनगर परिसरातील सर्व बौद्ध समाजबांधव उपस्थित होते.

