निलंगा : प्रतिनिधी
निलंगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाने ८७ टक्के यश संपादन केले आहे. विद्यालयातून एकूण ४० विद्यार्थी परीक्षेसाठी प्रवीष्ट झाले होते. त्यापैकी १ विद्यार्थी अनुपस्थित राहिला, तर ३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामधून ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत मानसी सूर्यवंशी हिने ६२.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. साक्षी निरुडे हिने ६१ टक्के गुणांसह द्वितीय तर प्राची गायकवाड हिने ५८.१७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य रमेश मदरसे, सचिव अभिजीत शिंदे, संचालक अभिषेक मदरसे, आदीत्य मदरसे, पर्यवेक्षक पी. एस. जाधव तसेच प्रा. मारुती पांचाळ, ए. डी. राठोड, प्रा. विमल गाडीलोहार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले \
















