लातूर : प्रतिनिधी
येथील प्रा. डॉ. संदिपान जगदाळे यांचा राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार व रेणापूर येथील मदिया खदीर सय्यद या मुलीने अखिल भारतीय व्यवसाय (आयटीआय) परीक्षेत देशात द्वितीय क्रमांक पटकावला. याबद्दल दोघांचाही येथील स्टार्क क्लासेसच्या वतीने गुरूवारी चेअरमन इसरार सगरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
उद्योग भवन येथे स्टार्क अकॅडमीत आयोजित कार्यक्रमास संचालक श्रीगणेश शिंदे, अकॅडमीक संचालक यु. व्ही. राव, बँकिंग तज्ज्ञ वाय.एस. मशायक, बून इंग्लिश स्कुलचे संस्थाध्यक्ष वहिद शेख, दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले, स्टार्कचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. जगदाळे नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. तर मदिया सय्यद हिचा पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते दिल्लीत गौरव करण्यात आला. त्यानिमित्त स्टार्क अकॅडमीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोनू डगवाले यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मादिया सय्यद हिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यशस्वी होण्यासाठी अभ्यास महत्वाचा असला तरी त्यात सातत्य महत्वाचे असल्याचे सांगितले.

