लातूर : प्रतिनिधी
बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विभाग लातूर चे विभागीय व्यवस्थापक रोशनजी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली औसा येथील निवास निवासी मतिमंद विद्यालय व पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालय औसा येथे विद्यार्थ्यांसाठी अन्नदान व तसेच संस्थेतर्फे मुलांना खेळण्यासाठी दोन व्हॉलीबॉल देण्यात आले. स्थानिक संचालक यांचा सत्कार करून तसेच वृक्षारोपण करण्यात आले व त्यानंतर लगेच कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित स्थानिक संचालक सुभाष आप्पा मुक्ता ,तानाजी मोरे, नगर परिषद नगरसेवक गोविंद भैया जाधव पाणीपुरवठा सभापती ,चक्रधर विद्यालयातील धानोरे सर ,स्थानिक संचालक निळकंठ काळे , संदिपान काका जाधव , तसेच गजेश्वर शिंदे या मान्यवरांचे सत्कार करून कार्यक्रम व्यवस्थित संपन्न झाला त्या वेळी शाखा औसाचे शाखा व्यवस्थापक विकास गोस्वामी,शाखा किल्लारी येथील शाखा व्यवस्थापक वाडकर साहेब व शाखा व शाखा औसा कर्मचारी उपस्थित होते.
















