25.1 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeअंतरराष्ट्रीयडोनाल्ड ट्रम्प यांची माघार; भारतासोबत करार होणार! भारत-अमेरिका व्यापार करारातील अडथळा दूर

डोनाल्ड ट्रम्प यांची माघार; भारतासोबत करार होणार! भारत-अमेरिका व्यापार करारातील अडथळा दूर

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेने भारतावर २५ टक्के अतिरिक्त शुक्ल लादले होते, ते आता मागे घेण्यास डोनाल्ड ट्रम्प तयार आहेत. तसेच भारत अमेरिकेच्या कृषी उत्पादनांसाठी आपल्या देशाील बाजारपेठ खुली करण्यास तयार असल्याचेही समोर आले आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यान अलिकडच्या काळात वाढलेला व्यापारातील तणाव कमी करण्यास तयार आहेत. रशियाकडून तेल खरेदीमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता, मात्र आता या वादावर तोडगा निघाल्याने व्यापार करारातील मोठा अडथळा दूर झाला आहे.

भारत अमेरिका व्यापार कराराशी संबंधित असलेल्या अधिका-यांनी म्हटले की, अमेरिकने लादलेले अतिरिक्त शुल्क काढून टाकल्यानंतर पुढील चर्चा आणखी वेगाने होईल. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेने २५ टक्के अतिरिक्त शुल्क लादले होते, मात्र आता भारताने तेलाची आयात कमी केल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव कमी झाला आहे. याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ‘दोन्ही देश निष्पक्ष व्यापार कराराच्या जवळ आहेत’ असं विधान केले होते. आता दोन्ही देश शुल्काच्या स्लॅबबाबत चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे. यात १२-१५ टक्के आणि १५-१९ टक्के असे दोन स्लॅब असण्याची शक्यता आहे.

कराराच्या चर्चेदरम्यान भारताने अमेरिकन सोयाबीन आणि मका मोफत किंवा कमी शुल्कात आयात करण्यास सहमती दर्शविली आहे. भारत इथेनॉल उत्पादनासाठी अमेरिकन मक्याचा वापर करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र दुग्धजन्य उत्पादनांबाबत कठोर अटी असणार आहेत. भारत केवळ मर्यादित आणि प्रक्रिया केलेल्या वस्तूंना परवानगी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. या करारात कृषी क्षेत्रातील वस्तूंवर खास लक्ष देण्यात आले होते, मात्र आता ट्रम्प यांनी या अटी मान्य केल्या आहेत. त्यामुळे लवकरच अंतिम करार होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR