26.6 C
Latur
Friday, November 7, 2025
Homeअंतरराष्ट्रीयड्रग माफिया विरूद्ध रियोत पोलिसांचे भीषण युद्ध सुरू

ड्रग माफिया विरूद्ध रियोत पोलिसांचे भीषण युद्ध सुरू

रियो दि जेनेरो : वृत्तसंस्था
ब्राझीलच्या रियो दि जेनेरो येथे ड्रग माफिया आणि पोलिसांमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. पोलीस हेलिकॉप्टरमधून बॉम्बफेक करत आहेत, तर ड्रग माफिया ड्रोनव्दारे पोलिसांवर हल्ला करत आहेत. गोळ्यांचा आवाजाने रियो दि जेनेरोचा गल्लीबोळ हादरुन गेला आहे. गल्लीबोळात ड्रग लॉर्डसचे मृतदेह पडलेले आहेत. ब्राझील पोलिसांनी ड्रग माफिया रेड कमांडो विरुद्ध ब्राझीलच्या इतिहासातील सर्वात मोठं ऑपरेशन सुरु केल्े आहे.

पोलिसांच्या कारवाईत ६० ड्रग तस्कर ठार झाले. समांतर सरकार चालवणा-या ड्रग तस्करांनी पोलिसांना टार्गेट केलं आहे. या मोहीमेमध्ये चार पोलीस शहीद झाले आहेत. या मोहीमेमध्ये आतापर्यंत एकूण ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.

रियो दि जेनेरोमध्ये ब्राझील पोलिसांचे हे ऑपरेशन सुरु आहे. शहरात युद्धासारखी स्थिती आहे. रियो दि जेनेरो ब-याच काळापासून ड्रग लॉर्डसच्या ताब्यात होतं. ड्रग तस्करीच सिंडिकेट चालवणा-यांना ब्राझीलमध्ये रेड कमांडो म्हटलं जातं. रियो सरकारनुसार, या ऑपरेशनमध्ये जवळपास २,५०० पोलीस आणि सैनिक सहभागी झाल आहेत. ड्रग तस्करी करणा-या गँगला टार्गेट करणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. ही गँग शहराच्या गरीब भागात सक्रीय आहे.

पोलिसांनी ड्रग तस्करांविरोधात कारवाई करताना हेलिकॉप्टर्स आणि चिलखती वाहनांद्वारे छापेमारीची कारवाई केली. या दरम्यान मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. ऑपरेशन दरम्यान अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. पोलिसांनी जवळपास ८१ संशयितांना अटक केली. या मोहीमेत पोलिसांनी २०० किलो कोकेन, शस्त्रे जप्त केली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR