24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमहाराष्ट्रढगाळ वातावरणासह थंडी

ढगाळ वातावरणासह थंडी

हवामानात मोठा बदल

मुंबई : प्रतिनिधी
राज्यासह देशात वातावरणात मोठा बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस, थंडी तर मध्येच उकाडा अशी स्थिती आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. मात्र, असे असतानाही राज्यात म्हणावा तेवढा गारठा नक्कीच नाही. सकाळी आणि संध्याकाळी थोडी थंडी जाणवत आहे, दुपारी उकाडा जाणवतो. वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पाऊस राज्यात झाला आणि तेव्हापासून थंडी गायब झाली. जानेवारी महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात थंडी जास्त होती. जानेवारी महिन्यातही थंडी कायम राहण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात उलट झाले आणि उकाडा जाणवत आहे. दुसरीकडे सध्या राज्यातील काही शहरांत प्रचंड वायुप्रदूषण वाढल्याचे बघायला मिळत आहे. कडाक्याची थंडी पडली. पुढील काही दिवसांत राज्यातील तापमानात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. यामुळे आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतात.

पुण्यात पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ झाली. त्यामुळे शहरात उन्हाचा चटका वाढला होता. मात्र, सोमवारी तापमानात लक्षणीयरीत्या घट झाली आहे परिणामी गारठा आवडला असून पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

राज्यातील सर्वांत नीचांकी तापमानाची नोंद निफाडमध्ये झाली. ७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद निफाडमध्ये झाली. गोंदियात ९.८ अंश सेल्सिअस तापमान होते. राज्यात गारठा कमी होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या निफाड, गोंदिया आणि धुळ्यात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.

देशातील अनेक भागात थंडी कमी-जास्त होताना दिसत आहे. मात्र, नुकत्याच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानंतर टेन्शन वाढल्याचे बघायला मिळत आहे. देशातील काही भागात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. रिमझिम पावसासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कधी, थंडी तर कधी पाऊस अशी स्थिती देशात आहे. दिल्लीमध्ये प्रदूषणात वाढ होण्याचा अंदाज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR