16.8 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeमहाराष्ट्रतटकरेंकडून पक्ष टेकओव्हर?

तटकरेंकडून पक्ष टेकओव्हर?

सुषमा अंधारेंच्या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : प्रतिनिधी
सध्या अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चर्चेत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनीही पक्षात मोठे बदल केले आहेत. पण हे बदल सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणणारे आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुकतीच १७ प्रवक्त्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे पक्षाची भूमिका मांडणारे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी, रूपाली पाटील-ठोंबरे, वैशाली नागवडे आणि संजय तटकरे यांची गच्छंती करण्यात आली आहे. यामध्ये मिटकरी आणि ठोंबरे पाटील यांची गच्छंती चर्चेचा विषय ठरत आहे. पक्षाने घेतलेल्या निर्णयावर उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसुबक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

भारतीय जनता पार्टीने तर जिल्ह्यानुसार प्रभारींची नियुक्ती केली आहे. शिंदे सेना, उबाठा गट यांच्याकडून देखील निवडणुकीच्या दृष्टीने मोठे बदल करून तयारीने वेग घेतला आहे. पण कुठल्याही पक्षाने पदाधिकारी नेमणे हा त्यांचा पूर्णत: अंतर्गत विषय आहे. मात्र तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या या यादीतील एकूण नावे बघता एक फरक लक्षात येईल. अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे हे दोन्ही प्रवक्ते कायम दादांसाठी खिंड लढवत असतात मात्र त्यांना या यादीत स्थान नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

सुरज चव्हाणांना तटकरेंकडून अभय
पण अगदी त्याच वेळेला मित्र पक्षातल्या आमदारांकडून दादांवर पराकोटीची जहरी टीका होताना अतिशय मौन बाळगणारे सुरज चव्हाण तटकरेंवर कोणी चकार शब्द काढला तर अगदी मारामारी करण्यापर्यंतची तत्परता दाखवू शकतात. कदाचित म्हणूनच या यादीत सुरज चव्हाणला स्थान आहे. थोडक्यात काय जो दादांची बाजू घेणार नाही त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. तटकरे हळूहळू पक्ष टेकओव्हर तर करत नाहीत ना ? असा संशय व्यक्त करणारा सवाल अंधारेंनी विचारला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR