Homeमहाराष्ट्रतन्वी कोलते ठरली यंदाची बिग बॉस

तन्वी कोलते ठरली यंदाची बिग बॉस

मुंबई : ११ जानेवारी २०२६ रोजी कलर्स मराठीवर सुरू झालेल्या बिग बॉस मराठी सिझन ६ ने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले. १९ एप्रिल रोजी सहाव्या सिझनचा ग्रँड फिनाले उत्साहात पार पडला. १०० दिवसांच्या या खेळात पाचही स्पर्धकांनी आपली जागा निर्माण केली होती. टॉप ५ स्पर्धकांमधून तन्वी कोलतेने बाजी मारली. प्रेक्षकांकडून मिळालेल्या मतांच्या जोरावर आणि उत्कृष्ट टास्क परफॉर्मन्समुळे या स्पर्धकाने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरलं. त्यामुळे तन्वी कोलतेवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

अभिनेता रितेश देशमुख यांनी होस्ट केलेला यंदाचा बिग बॉसचा सिझन प्रचंड गाजला. विशेष म्हणजे भाऊचा धक्का या एपिसोडला प्रेक्षकांकडून विशेष प्रेम मिळाले. टॉप ५ स्पर्धकांची नावे जाहीर होताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. टॉप ५ स्पर्धकांमध्ये तन्वी कोलतेला तिकीट टू फिनालेचा मान मिळाला होता.
तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, दिपाली सय्यद आणि विशाल कोटियन हे स्पर्धक रेसमध्ये होते. पाचही स्पर्धकांनी मास्टरमाईंडने प्रत्येक टास्क पूर्ण केले. शेवटी २ स्पर्धक उरले होते. तन्वी कोलतेने सहाव्या सिझनच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR