नागपूर : प्रतिनिधी
प्रकाश आंबेडकर जे बोलले आहेत ती काळाची गरज आहे. माझा नेता मुख्यमंत्री होणार असेल तर त्यांच्या तोंडात मी पेढा टाकायला हवा. त्यांचे आभार मानायला हवेत. शेवटी ते ज्येष्ठ नेते आहेत. प्रकाश आंबेडकर यांना काही तरी समजत असेल म्हणून ते बोलत आहेत. सध्या जर बघितले तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेता म्हणून चांगले काम करत आहेत. ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात.
अब्दुल सत्तार म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी माणूस पंतप्रधान होईल असे म्हटले आहे. महाराष्ट्रातील कोणताही पुढारी जर पंतप्रधान झाला तरी आम्हाला त्याचा आनंद होईल. पृथ्वीराज चव्हाण बोलले म्हणजे त्यांना काही तरी माहिती असेल म्हणूनच ते बोलले असतील.
अब्दुल सत्तार म्हणाले की, शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत. सर्व पक्षीय नेते त्यांचे मार्गदर्शन घेत असतात. त्यांच्याइतका राजकारणाचा अभ्यास देशात आता काहीच लोकांना आहे. ते जर काही बोलत असतील तर एकनाथ शिंदे नक्कीच मुख्यमंत्री होतील. मुस्लिम मते ही कोणत्या एका पक्षाची नाहीत ती विकासाच्या मागे असतात. सामाजिक आणि धार्मिक भावना जपणा-यांसोबत ही मते राहतात. माजी खासदार जलील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर बोलू नये.
भाजपसोबत युती होणार नाही
अब्दुल सत्तार म्हणाले की, सिल्लोडमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आमची भाजपसोबत युती होणार नाही. भाजप आमच्याविरोधात सर्व पक्ष घेऊन लढत आहे. एकटा भाजप तिथे आमच्याविरोधात लढू शकत नाही. एमआयएम आणि भाजप सिल्लोडमध्ये एकत्र आले आहेत.

