तांदूळ महागणार!; भाताचा उत्पादन खर्च वाढला

पुणे : प्रतिनिधी
कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली परिसरात भात पिकावर सध्या पानावरील अळी कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतक-यांच्या उत्पादन खर्चात आणखी वाढ झाली आहे. पावसाची उघडझाप, त्यानंतर पडणारे कडक ऊन, वातावरणातील बदलामुळे भात पिकावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतक-यांकडून कीटकनाशके, बुरशीनाशकासाठी आवश्यक टॉनिकची फवारणी सुरू आहे.

कोपर्डे हवेली परिसरातील भाताला राज्यभर मागणी आहे, दर्जेदार तांदळाची बाजारपेठेत स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. मात्र, यंदा भात लागवडीपासूनच उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. मजुरी, खते, औषधे, रोपांची लागवड, चिखलणी, मशागत, पाणी व्यवस्थापनासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. त्यात आता किडी व रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढला आहे.

पानावरील अळी पानांच्या पाठीमागील बाजूस अंडी घालते. अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास पानांचे नुकसान होऊन पिकाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रतिकूल हवामानामुळे काही ठिकाणी भात पिकाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता शेतक-यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकरी पिकाची नियमित पाहणी करून आवश्यक फवारणी करत आहेत. उत्पादन खर्च वाढल्याने आगामी काळात भात व तांदळाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. शेतक-यांना योग्य बाजारभाव मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

लागवडी, फवारणी बरोबर मजुरांचे वाढलेले दर जेरीस आणत आहेत. त्यातच उन पावसाच्या खेळामुळे भाताची वाढ खुंटली आहे. यंदा खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी परिस्थिती आहे. भाताची वाढ खुंटली असून फुटवा देखील निघाला नाही. उत्पादन खर्च वाढल्यामुळे तांदूळ देखील महागणार, अशी माहिती भात उत्पादक शेतकरी महादेव चव्हाण यांनी दिली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41

Latest news