मुंबई : प्रतिनिधी
पावसाळा सुरू झाला की, सर्वसामान्यांची ताडपत्री खरेदीसाठी लगबग सुरू होते. मुंबईतील बाजारपेठेत नॉन टेरेबल टारपोलिन आली आहे. चांगल्या दर्जाची व टिकाऊ असणा-या ताडपत्रीची किंमत प्रतिफूट पाच रुपये आहे. आखाती देशातील युद्धामुळे प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या दरवाढीचा परिणाम ताडपत्रीच्या दरावर झाला आहे. सर्व प्रकारच्या ताडपत्री फुटामागे एक रुपया प्रमाणे ताडपत्री दरात सुमारे ३० टक्के वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
मस्जिद बंदर रेल्वेस्थानक परिसर ताडपत्रीची बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जून महिन्यात या परिसरामध्ये ताडपत्री व प्लॅस्टिक कागदाची विक्री दुकानामधून होते. यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली.
पाच ते सहा दिवस धुवाधार पाऊस पडला. त्यामुळे या काळात ताडपत्रीची सुमारे २० ते ३० टक्के ग्राहकांची मागणी वाढली होती मुंबईत जोरदार पावसाने झोपडपट्टया जमीनदोस्त होतात. त्याच्या बचावासाठी ताडपत्री उपयोगी पडते. झोपडपट्टी बरोबर मोठ-मोठ्या बांधकामे, शेततळे, शेतीकाम, ट्रक व टेम्पो गार्डचे आवरण बांधणे, बांधकामावरील सिमेंट पोती बंदिस्त करणे यासाठी ताडपत्री वापरली जाते.
विशेषत: या ताडपत्री ट्रक, सिमेंट पोती गोडाऊन यासाठी वापरल्या जातात. मुख्य निदर्शक दर्शविणारे दीडशे जीएसएम पासून ताडपत्री ही अडीचशे जीएसएम पर्यंत आहे.ती टिकाऊ असते. घाऊक बाजारात प्रति स्केअर फुटाचा दर अडीच रुपयांपासून ते ५ रुपया पर्यत आहे.विविध प्रकारच्या ताडपर्त्या या टिकाऊ व उच्च दर्जाच्या आहेत. ताडपत्री बरोबर प्लॅस्टिक कागदाची ग्राहकाकडून मागणी असते.
विविध रंगांत ताडपत्री उपलब्ध
निळा, पिवळा, भगवा, सिल्व्हर, काळा अशा विविध रंगात आहे.सर्वोधिक निळ्या व पिवळ्या रंगाच्या ताडपर्त्यांना मागणी आहे. अहमदाबाद येथून ताडपत्री आणली जाते. मेपासून ते जुलै महिन्यापर्यंत व्यवसाय असतो. त्यानंतर गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश तरुण मंडळ उभारणी व मुर्तीकार यांच्याकडून शेड उभारणीसाठी ताडपत्रीची मागणी होते. प्लास्टिक साठी आखाती देशांमधून कच्चा मालाची आयात होते. त्यातच इंधन तेल दरवाढ यामुळे यावर्षी ताडपत्री च्या दरात वाढ झाली आहे.















