17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeपरभणीतालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सेलू : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा सेलू, स्वर्गीय सौ.दुर्गाताई दत्तात्रय कुलकर्णी आणि श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा नूतन कन्या प्रशालेत संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा पाटील, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, स्पर्धेचे परीक्षक एस.डी. पाटील, प्रमोद देशमुख, प्रशालेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात कै.दुगार्ताई कुलकर्णी आणि साने गुरुजी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा प्राचार्य द.रा.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाद्वारे पार पडली. खरा तो एकची धर्म ही प्रार्थना रेणुका अंबेकर यांनी म्हटली. प्रास्ताविक उपमुख्याध्यापक घोगरे यांनी केले. तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत सेलू तालुक्यातील १८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवत अनेक संस्कारक्षम, बोधपर बोधकथा सांगत श्रोत्यांची मने जिंकली. सूत्रसंचालन तथा आभार कीर्ती राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील मोगल, वैशाली चव्हाण, शशिकांत देशपांडे, यशोदा चव्हाण, रूपाली पवार, सुरेखा भांबळे, सोलापूरे प्रणिता, सोनाली कुबरे, सुरेश हिवाळे यांनी सहकार्य केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR