31.1 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeलातूरतिरंग्यानी सजली लातूरची बाजारपेठ

तिरंग्यानी सजली लातूरची बाजारपेठ

लातूर : प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाला अवघा एक दिवस उरला असताना लातूरच्या बाजारामध्ये मोठया प्रमाणावर तिरंग्­याचे विविध साहित्­य विक्रिसाठी उपलब्ध झाले आहेत. यामध्ये तिरंगा झेंड्याची विक्री मोठया प्रमाणावर होत आहे. तसेच बाजारामध्ये अनेक नवीन वस्­तू  पाहायला मिळत आहे. यामध्ये खादीसह तिरंगी दुपट्टा, टी-शर्ट, हातातील माळ, टोपी अशा विविध वस्­तू विक्रीसाठी दाखल झाल्­या आहेत तर खरेदी करण्यासाठी ग्राहकांचीदेखील रेलचेल वाढली असल्­याचे व्­यापा-यांनी सांगितले.
दरवर्षी बाजारात प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात काहींना काही नवीन वस्तू पाहायला मिळतात. अशातच प्रजासत्ताक दिनाच्या विविध कार्यक्रमांची आतापासून रूपरेषा आखली जात आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तिरंगा आणि खादीच्या कपड्यांना अधिक मागणी आहे. त्यातच प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सर्वांनी आपापल्या पद्धतीने तयारी करण्यास सुरुवात केली आहे.
मोठमोठे व्यापारी आणि रस्त्यावरील विक्रित्यांनी आपली दुकाने तिरंगा, दुपट्टा, माळा, पतंगांनी सजवली आहेत. भगवा, पांढरा आणि हिरवा रंग वापरून बनवलेल्या अनेक प्रकारच्या वस्तू बाजारात विकल्या जात आहेत. लहान मुले तिरंग्याच्या टोप्या, लॉकेट तर मुली सोनेरी तसेच चांदीच्या रंगात रंगलेल्या तिरंग्याच्या बांगड्या खरेदी करताना दिसत आहेत. याशिवाय तिरंग्याच्या प्लास्टिकच्या टोप्या, हँड बँड आणि मुलींसाठी दुपट्टे, हेअर बँड, बांगड्या, टी- शर्ट आदींची विक्री केली जात आहे. दुचाकी आणि वाहनांवर झेंडे लावण्यासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे.  त्­यामुळे झेंड्यांना यंदा मागणी वाढली आहे. बाजारपेठांमध्ये सर्वत्र तिरंगा झेंडे दिसत आहेत. त्­याशिवाय वेगवेगळया आकारातील ब्रोचेस, टोप्या, रिबन इत्यादी तिरंग्याच्या विविध वस्तू मोठया प्रमाणावर खरेदी  केल्­या जात आहेत. यासोबतच भेटवस्तूंमध्ये तिरंग्याच्­या वस्­तूंचादेखील समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR