26.2 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeलातूरतीन दिवसापासून संकेतस्थळ ठप्प!

तीन दिवसापासून संकेतस्थळ ठप्प!

लातूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महा-ई सेवा केंद्रावर महिलांची अजूनही गर्दी आहे. मात्र ऑनलाईन अर्ज भरण्याचे संकेतस्थळ गेल्या तीन दिवसापासून बंद असल्याने महिलांना महा-ई सेवा केंद्राकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे महिलांना मनस्ताप होत आहे.
लातूर जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत ३ लाख ४० हजार ३६४ महिलांनी ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज भरले आहेत. उर्वरित महिलांचे अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येवू नयेत, यासाठी शासनाच्यावतीने ँ३३स्र२://’ंंि‘्रुंँ्रल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल/  हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. तरी या योजनेसाठी पात्र महिलांनी अर्ज भरण्यासाठी या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र गेल्या तीन दिवसापासून सदर संकेत स्थळ उघडत नसल्याने महिलांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आडचणी येत आहेत. तसेच महा-ई सेवा केंद्रावर महिला अर्ज भरण्यासाठी गेल्या असता अजून पोर्टल, संकेतस्थळ सुरू झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महिलांच्या महा-ई सेवा केंद्रावर चकरा वाढल्या आहेत.
१ तास उशीराने येत आहे ओटीपी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिला ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी येत आहेत. मात्र शक्यतो संकेत उघडत नाही. उघडले तर अर्ज भरताना एक तासाभरानंतर ओटीपी येत आहे. त्यामुळे या कामाला गती येत नसल्याचे महा-ई सेवा संचालकांच्याकडून सांगण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR