26 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeमहाराष्ट्रती नोटीस नव्हे तर खुलासा पत्र : रुपाली ठोंबरे

ती नोटीस नव्हे तर खुलासा पत्र : रुपाली ठोंबरे

पुणे : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे हा वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात शिस्तभंगाची नोटीस जारी केल्याचे समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर रुपाली ठोंबरे पाटील यांनी तात्काळ शनिवारी (८ नोव्हेंबर) पुण्यात अजित पवार यांची भेट घेतली.

या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्टीकरण दिले की, ‘मला पक्षाने नोटीस दिली नसून मला पक्षाकडून खुलासा पत्र दिले आहे.दरम्यान, रुपाली ठोंबरे यांच्यावर मारहाणीचा आरोप करणा-या माधवी खंडाळकर या महिलेनेही अजित पवारांची पुण्यात भेट घेतल्याचे समोर आले आहे.

अजित पवारांच्या भेटीनंतर नेत्या रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, मला पक्षाची नोटीस नाही मला पक्षाचे खुलासा पत्र शुक्रवारी (७ नोव्हेंबर) रात्री दिले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्याविरोधात माध्यमांमध्ये जी काही विधाने केली, त्याबाबत खुलासा मला माझ्या पक्षाने मागितला आहे. त्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला असून त्यावर मी खुलासा देईन.’’ असे म्हणत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR