24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमहाराष्ट्रतुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा : गुलाबराव पाटील

तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा : गुलाबराव पाटील

जळगाव : प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे नेहमी झोकात नको ते वक्तव्य करत असतात. त्यांच्या अशा वक्तव्यांनी ते नेहमी चर्चेत येतात. आता अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून ते चर्चेत आले आहेत.
जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, आता राज्याच्या पोटी राजा जन्माला येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाटा, बिर्ला यांना एक मत देण्याचा अधिकार दिला आहे. तोच अधिकार आपल्या सर्वांना दिला आहे. हेमा मालिनी यांना देखील एक मत देण्याचा अधिकार दिलाय. त्यामुळे तुमच्या बायकोला सुद्धा मत देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी तुमची बायको हेमा मालिनी आहे असे समजा, असे वादग्रस्त वक्तव्य पाटलांनी यावेळी केले.

अलिकडेच त्यांनी एक वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘नोक-या आहेत, पण मराठी माणसात काम करण्याची मानसिकता नाही.’ बिहारचा माणूस येथे येऊन पोट भरतो आणि आपण त्यांच्यावर टीका करतो. तुम्ही का टीका करता. कोण म्हणतं काम नाही, काम आहे..तरुणांना राग आला तर आला कारण आता ४ वर्षांनी निवडणुका आहेत, असे विधान नुकतेच गुलाबराव पाटील यांनी केले होते त्यावरून ते वादात सापडले होते.

आता पुन्हा एकदा मतदानाचा हक्क काय असतो हे समजावताना त्यांनी केलेल्या विधानाने पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

गालावरून घसरला होता तोल
दरम्यान, तीन वर्षांपूर्वी त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांबाबत टिप्पणी करताना हेमा मालिनी यांचे नाव घेत वक्तव्य केले होते. आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत, असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले होते. त्यावेळी सर्वसामन्य लोक असे बोलत असतील तर आपण समजू शकतो परंतु खासदार किंवा संविधानिक पदावरील लोक असे बोलत असतील तर ते योग्य नाही. या शब्दात हेमा मालिनी यांनी पाटील यांच्यासह असे बोलणा-यांचा समाचार घेतला होता.
आता तीन वर्षांनी पुन्हा गुलाबराव पाटील यांनी हेमा मालिनी यांचे नाव घेत वक्तव्य केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR