23.2 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeलातूरतुलसी विवाहासाठी साहित्य खरेदीसाठी गर्दी

तुलसी विवाहासाठी साहित्य खरेदीसाठी गर्दी

लातूर : प्रतिनिधी
मुख्य दिवाळी संपताच मिनी दिवाळी म्हणून तुळशी विवाहाकडे पाहिले जाते. कार्तिक शुक्ल प्रबोधनी एकादशीच्या दुस-या दिवसापासून तुळशी विवाहास प्रारंभ झाला आहे. तुलसी विवाहासाठी लागणारे साहित्य शहरातील बाजारपेठेत उपलब्ध झाल्याने परिसर तुलसी विवाहाच्या साहित्यांनी गजबजून गेला होता. बाजारात हे साहित्य खरेदीसाठी नागरीकांची गर्दी दिसून येत आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीच्या विवाहाची मोठी परंपरा आहे. तुळशी विवाहानंतर ख-या अर्थाने लग्नसराईस प्रारंभ होतो. त्यामुळे दिवाळीनंतर येणा-या तुळशी विवाहाकडे अनेकांचे लक्ष लागलेले असते.  तुळशी विवाहानिमित्त घरोघरी तुळशी वृदावनाभोवताली फुलांची रांगोळी काढली जाते. तसेच रंगरंगोटी व तोरणे, पताके व फुलांनी सजावट केली जाते. तुळशीच्या लग्नासाठी तुळशी वृंदावन, हळदी-कुंकू, चरमुरे, फुले, हार, अक्षदा, बाशिंग, ऊस, चिंचा, बोरे, नैवेद्य फराळ किंवा पेढे आदी साहित्य लागते.
कार्तिकी शुक्­ल प्रबोधनी एकादशीनंतर द्वादशीपासून तुळसी विवाहाला प्रारंभ झाला आहे. हे विवाह सोहळे कार्तिकी पौर्णिमे पर्यंत म्हणजे दि. १५ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहेत.  तुळशी विवाह निमित्त लातूरच्या गंजगोलाई, दयानंद गेट परिसर, तसेच इतर ठिकाणच्या चौकात रांगोळी, फुले, हार, बाशिंग, बेल, चिंच, आवळा आदी साहित्य बाजारपेठामध्­ये ३० रूपया विक्रीसाठी उपलब्­ध आहे. तसेच दोन ऊसाची जोडी ४० रूपये प्रमाणे विक्री होत होते. या साहित्य खरेदीसाठी नागरीकांची गर्दी होताना दिसून आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR