22.6 C
Latur
Sunday, December 14, 2025
Homeमनोरंजन‘तेरे इश्क में’चा बॉक्स ऑफिसवर जलवा

‘तेरे इश्क में’चा बॉक्स ऑफिसवर जलवा

मुंबई : प्रतिनिधी
धनुष आणि क्रिति सेनन यांच्या ‘तेरे इश्क में’ या बहुचर्चित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका करत दुस-याच दिवशी इतिहास रचला आहे. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटाने प्रदर्शित होताच २०२५ मधील टॉप ओपनर्समध्ये आपले स्थान पक्के केले आहे. पहिल्या दिवसापासून सुरू झालेल्या या कमाईच्या रेकॉर्डने आता १० वर्षांपूर्वीचे धनुषचेच रेकॉर्ड मोडले आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल १६ कोटींची ओपनिंग केल्यानंतर चित्रपटाने दुस-या दिवशी दुपारी ३.१० वाजेपर्यंत आणखी ४.३५ कोटींची भर घालत दोन दिवसांची एकूण कमाई २०.३५ कोटी केली आहे. सॅक्निल्कने दिलेली ही प्राथमिक आकडेवारी असून दिवस अखेरीस ही कमाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.
‘शमिताभ’चे रेकॉर्ड मोडले

आश्चर्य म्हणजे ‘तेरे इश्क में’ने फक्त दोन दिवसांतच धनुषच्या ‘शमिताभ’ (२०१५) या चित्रपटाच्या २२.२७ कोटींच्या लाईफटाईम कलेक्शनची बरोबरी केली आहे. ‘शमिताभ’ने जेवढं कमवलं, तेवढं ‘तेरे इश्क में’ने दोन दिवसांत कमवत जुने रेकॉर्ड मोडले आहे.

चित्रपटाची क्रेझ पाहता, आता धनुषच्या ‘रांझणा’ (२०१३) च्या ६०.२२ कोटींच्या लाईफटाईम कलेक्शनला ओलांडण्याची वेळ आली आहे. सध्याचा ट्रेंड आणि विकेंडची वाढती कमाई पाहता हा टप्पा पार करणे कठीण वाटत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR