तेलाचा खेळ!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोलांटउड्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते कधी काय बोलतील याचा नेम नसतो. नुकतीच त्यांनी एक लोणकढी थाप मारली. पुन्हा एक दावा करताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत रशियाकडून करत असलेली तेल खरेदी थांबवण्याचे आपल्याला आश्वासन दिले आहे. या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा व्यापार आणि धोरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे मी समाधानी नव्हतो. त्यांनी (मोदींनी) मला आश्वासन दिले आहे की, ते रशियाकडून तेल खरेदी करणार नाहीत. ही एक मोठी गोष्ट आहे असे सांगून ट्रम्प म्हणाले, पंतप्रधान मोदींसोबत आपले ‘उत्तम संबंध’ आहेत. ट्रम्प पुढे म्हणाले, तेल खरेदी थांबेल. भारत आता तेल खरेदी करणार नाही. हा बदल लगेच होणार नसला तरी थोड्याच काळात होईल. रशियाकडून तेल खरेदी करत असल्याबद्दल अमेरिकेने भारतावर ५० टक्के शुल्क लादले आहे. जे सर्वाधिक शुल्कापैकी एक आहे. यात रशियन तेल खरेदीमुळे २५ टक्क्यांच्या अतिरिक्त शुल्काचा समावेश आहे. ट्रम्प यांचा हा दावा, एक आठवड्यापूर्वी त्यांचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी केलेल्या दाव्यानंतर आला आहे. भारताने रशियन तेलापासून दूर राहावे असे ग्रीर म्हणाले होते. पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याबद्दल अमेरिका नाराज आहे. कारण अशा प्रकारच्या खरेदीमुळे युक्रेन युद्धात रशियाला आर्थिक मदत मिळाली.

रशिया-युक्रेन युद्ध चार वर्षे सुरू असून या युद्धात दीड लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान मोदी हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याचे आश्वासन मला दिले आहे. त्यामुळे रशियावर दबाव वाढवण्याच्या दृष्टीने हे मोठे पाऊल असून चीनलाही आम्ही हेच करायला लावणार आहोत. भारतासह अनेक देशांवर भरमसाठ आयात शुल्क आकारल्यानंतर भारत आणि पाकिस्तानसह जगभरातील आठ युद्धे थांबवल्याचा दावा करणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताबद्दल नवा दावा केला आहे. रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी भारत थांबवणार असल्याचा शब्द आपल्याला दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या दाव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले की मोदी व ट्रम्प यांच्यात बुधवारी कोणताही दूरध्वनी संवाद झालेला नाही. तेल व गॅसच्या किमती आणि त्यांचा सुरक्षित पुरवठा निश्चित करणे ही आमच्या ऊर्जा धोरणाची दोन महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. यामध्ये आमच्या ऊर्जा स्रोतांचा विस्तार करणे आणि बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी योग्य ती पावले उचलणे यांचा समावेश आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अमेरिकेचा विचार केला तर, आम्ही अनेक वर्षांपासून आमची तेल आणि गॅस खरेदी वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या दशकात यात सातत्याने प्रगती झाली आहे. सध्याच्या प्रशासनाने भारतासोबत ऊर्जा सहकार्य वाढवण्यात रस दाखवला आहे. यावर चर्चा सुरू आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. युक्रेनमधील युद्धावरून रशियाला एकाकी पाडण्याच्या प्रयत्नातील हे एक मोठे पाऊल असून आता आम्ही चीनलाही हेच करायला लावणार आहोत, असेही ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले. चीनसोबतच्या तणावाच्या काळात भारताला एक विश्वासू भागीदार म्हणून पाहता का, असे विचारले असता ट्रम्प म्हणाले, ऊर्जा धोरणावरून वाद असला तरी मोदी यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत, ते माझे मित्र आहेत. ब्रिटिश पंतप्रधान भारत दौ-यावरून परतल्यानंतर रशियाकडून तेल खरेदी करणा-या भारतीय कंपन्यांवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रशियाची आर्थिक ताकद कमी करणे, युक्रेन युद्धात रशियाला होणारे फंडिंग रोखणे हा या निर्णयाचा हेतू आहे, असे ब्रिटिश सरकारने सांगितले. रशिया आता जागतिक तेल बाजारपेठेतून हळूहळू बाहेर होत आहे.

कुठलाही देश अथवा कंपनीने रशियाच्या तेल व्यापाराला मदत करू नये यासाठी ब्रिटन प्रयत्नशील आहे. आम्ही अशा सर्व कंपन्यांवर दबाव निर्माण करू जे रशियाला मदत करतात. मग तो भारत असेल वा चीन. रशियाच्या तेलासाठी आता जागतिक बाजारपेठेत जागा नाही, असे ब्रिटनने म्हटले आहे. भारताची ‘नयारा एनर्जी’ एक प्रमुख खासगी रिफायनरी कंपनी आहे. या कंपनीने गत वर्षी रशियाकडून ‘रेकॉर्ड ब्रेक’ तेल खरेदी केले होते. नयारा एनर्जीने १०० दशलक्ष बॅरल कच्चे तेल रशियाकडून खरेदी केले होते. ज्याची किंमत सुमारे ४१ हजार कोटी रुपये आहे. भारत आणि चीनच्या काही कंपन्या रशियाकडून तेल खरेदी करून त्यांची अर्थव्यवस्था मजबूत करीत आहेत. त्यावर ब्रिटनने नाराजी व्यक्त केली. ही खरेदी रशियाला युक्रेनसोबतच्या युद्धात आर्थिक ताकद देते, असा ब्रिटनचा आरोप आहे. पंतप्रधान मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात, अशी खोचक टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. मोदी यांनी रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करणार असल्याचा शब्द दिला असल्याचा दावा ट्रम्प यांनी नुकताच केला.

या दाव्यानंतर राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केले. ते म्हणाले, टॅरिफ वाढ आणि भारत-पाक सशस्त्र संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा ट्रम्प यांनी वारंवार केल्यानंतरही मोदी सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन करत राहिले. भारत रशियन तेल खरेदी करणार की नाही, हे ठरविण्याची आणि जाहीर करण्याची ट्रम्प यांना परवानगी देणे, ट्रम्प वारंवार अवहेलना करत असूनही त्यांना अभिनंदनाचे संदेश पाठवणे, अर्थमंत्र्यांचा अमेरिकेचा दौरा रद्द करणे, ईजिप्तमधील शर्म-अल-शेखची बैठक टाळणे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याचे खंडन न करणे यावरून मोदी ट्रम्प यांना घाबरतात हे सिद्ध होते, असे राहुल गांधी म्हणाले. भारत आणि रशियाचे संबंध विश्वासाच्या भक्कम पायावर उभे असून रशियन तेल भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे असे रशियाने म्हटले आहे. एकूण काय, तेलाचा सारा खेळ सुरू आहे, असेच म्हणावे लागेल!

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news