23.9 C
Latur
Monday, September 9, 2024
Homeमुख्य बातम्या... त्यांना महाराष्ट्र अशांत करायचाय!

… त्यांना महाराष्ट्र अशांत करायचाय!

‘जोडे मारो’ आंदोलनावर मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र

मुंबई : वृत्तसंस्था
मविआतर्फे हुतात्मा चौकापासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ‘जोडे मारो’ आंदोलन केले जात आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली.

विरोधकांना महाराष्ट्र अशांत करायचा आहे. त्यांना महाराष्ट्र शांत नको आहे. महाराष्ट्रामध्ये दंगली व्हाव्यात, जातीजातीत तेढ व्हावी असा प्रयत्न त्यांनी लोकसभेपूर्वीही केला होता. पण महाराष्ट्रातील जनता संयमी आहे, सूज्ञ आहे. म्हणून राज्य सरकारही कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करत आहे.

लोकसभेत खोटं नरेटिव्ह पसरवून आरक्षण जाणार, संविधान बदलणार हे होणार ते होणार सांगून लोकांमध्ये दहशत, भीती पसरवून मतं मिळवली. पण माणूस एकदा फसतो. पुन्हा पुन्हा फसत नाही असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी खोचक टोला लगावला आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लेकीबाळी सुरक्षित होत्या का? नवनीत राणांना जेलमध्ये टाकलं. कंगना राणौतचं घर तोडलं. किती महिलांवर अन्याय केला… महाविकास आघाडी सरकारमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नये असं म्हणत मुख्यमंत्री श्ािंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR