दक्षिण चीन समुद्रात कोसळली अमेरिकन नौदलाची २ विमाने! 

वॉशिंग्टन/बीजिंग : वृत्तसंस्था
दक्षिण चीन समुद्रातील वाढत्या चीन-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या नौदलाला मोठा धक्का बसला आहे. रविवारी एकाच दिवशी आणि अर्ध्या तासाच्या अंतराने अमेरिकेची दोन विमाने या समुद्रात अपघातग्रस्त झाली. सोमवारी ही घटना चर्चेत आली. यामध्ये एक एमएच-६०आर सीहॉक हेलिकॉप्टर आणि दुसरे एफ/ए-१८एफ सुपर हॉर्नेट लढाऊ विमान सामील आहे. दोन्ही विमाने अमेरिकेच्या ‘यूएसएस निमित्झ’ या विमानवाहू युद्धनौकेवरून नियमित मोहिमेवर निघाली होती.
यूएस नौदलाच्या प्रशांत तळावरून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, रविवार दुपारच्या सुमारास हे अपघात झाले. स्थानिक वेळेनुसार दुपारी २.४५ च्या सुमारास एमएच-६०आर सीहॉक हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. सुदैवाने, बचाव कार्यादरम्यान हेलिकॉप्टरमधील तिन्ही क्रू सदस्य सुरक्षितपणे बाहेर काढले गेले. या घटनेनंतर अवघ्या ३० मिनिटांनी, दुपारी ३.१५ च्या सुमारास एफ/ए-१८एफ सुपर हॉर्नेट हे लढाऊ विमानही क्रॅश झाले. या विमानाच्या वैमानिकालाही वेळीच बाहेर पडण्यात यश आले आणि त्याला सुरक्षित वाचवण्यात आले.
नौदलाने दोन्ही घटनांची चौकशी सुरू केली आहे. यूएसएस निमित्झ हे विमानवाहू जहाज पश्चिम किना-याकडे परतण्याच्या अंतिम टप्प्यात असताना दक्षिण चीन समुद्रात दाखल झाले होते.
भू-राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर घटना
हा अपघात अशा वेळी झाला आहे, जेव्हा दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. चीन या समुद्रातील मोठ्या भागावर आपला दावा सांगतो, जो आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळला आहे. अमेरिका या भागात नियमितपणे आपली युद्धनौका आणि विमाने पाठवून चीनच्या दाव्यांना आव्हान देत असतो. यूएसएस निमित्झ हे युद्धनौका १७ ऑक्टोबर रोजीच या समुद्रात दाखल झाली होती.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02

Latest news