दयानंद विधी महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा

लातूर : प्रतिनिधी
दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद विधी महाविद्यालय, लातूर यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा – २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा प्रख्यात साहित्यिक डॉ. नागोराव कुंभार यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेसाठी ‘सोशल मीडियाने लोकशाही कमकुवत करण्यापेक्षा अधिक बळकट केली आहे का?’ हा विषय ठेवण्यात आला होता. आधुनिक लोकशाही व्यवस्थेमध्ये सोशल मीडियाची भूमिका, जनमतनिर्मिती, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, माहितीचा प्रसार तसेच सोशल मीडियाचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम या विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण व प्रभावी विचार मांडले. या कार्यक्रमासाठी दयानंद विधी महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष अ‍ॅड. आशिष बाजपाई, अ‍ॅड. श्रीकांतज् उटगे, प्राचार्या डॉ. पूनमजी नाथानी, डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. गणेश बेळंबे, डॉ. मच्छिंद्र खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या राज्यस्तरीय स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील २१ संघांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी तर्कशुद्ध युक्तिवाद, प्रभावी वक्तृत्व, विषयाचे सखोल आकलन आणि वैचारिक परिपक्वता यांच्या जोरावर आपली मते मांडली. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांचे महत्त्व समजून घेण्यास, चिकित्सक विचारसरणी विकसित करण्यास आणि समकालीन सामाजिक प्रश्नांवर निर्भीडपणे आपले मत व्यक्त करण्यास प्रोत्साहन मिळाले. सर्व पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.  त्यांच्या यशाचे कौतुक करून अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी वक्तृत्वकला, तर्कशक्ती, आत्मविश्वास आणि सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याची चिकित्सक दृष्टी अधिक विकसित करावी, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. दयानंद विधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांनावैचारिक देवाणघेवाणीसाठी आणि लोकशाहीच्या विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण विचारपीठ उपलब्ध झाले. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे या स्पर्धेतून अधोरेखित झाले. घेतले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded News | रोहित पवारांवर गुन्हा दाखल करा; भाजपाची पोलिसांकडे मागणी, महापौरांचे निवेदन
02:37
Video thumbnail
Latur News | समान काम समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; न्यायालयीन कामकाज ठप्प
05:22
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
LIVE - आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी शॉपच उद्घाटन
00:00
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42
Video thumbnail
Election Update|लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
04:13
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07

Latest news