चाकूर: अ. ना. शिंदे
तालुक्यातील शेतक-याला दयेची भीक नको, त्यांच्या कष्टाला न्याय हवा. तात्पुरती मदत नको, संकटातून सावरण्यासाठी भक्कम आधार हवा. कारण शेतकरी वाचला, तरच शेती वाचेल; शेती वाचली, तरच गावं वाचतील; आणि गावं वाचली, तरच देशाची भूक भागेल. ५ हजार रुपयांची ही रक्कम नक्कीच खूप कमी वाटते, कारण सध्याची महागाई आणि शेतीचा झालेला खर्च या तुलनेत हा आधार खूपच लहान आहे.पण केंद्र सरकारकडून दुष्काळाची मोठी मदत मंजूर होऊन ती प्रत्यक्षात येण्यासाठी खूप वेळ लागतो. तोपर्यंत शेतक-यांना दिवाळीच्या सणासुदीत काहीतरी तातडीचा खर्च भागवता यावा, यासाठी हा तात्कालिक अग्रिम म्हणून दिला गेला आहे.५ हजार रुपयांची ही रक्कम म्हणजे संपूर्ण नुकसानभरपाई नाही.
केंद्राकडून जशी मुख्य दुष्काळी मदत मंजूर होईल, तशी उर्वरित मोठी रक्कम शेतक-यांना नंतर दिली जाईल. शासनाने जबाबदारी टाळली आहे का?हा प्रश्न अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा आहे. देशाची अर्थव्यवस्था शेतीवर उभी असताना संकटसमयी शेतक-याला मदतीसाठी प्रशासकीय चक्रांमध्ये अडकून राहावे लागते, ही वस्तुस्थिती नक्कीच वेदनादायी आहे आणि यामुळे व्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे.
















