Homeमहाराष्ट्रदररोज ४० ते ४५ राजकीय नेते खरात याच्या संपर्कात

दररोज ४० ते ४५ राजकीय नेते खरात याच्या संपर्कात

नाशिक : प्रतिनिधी
अशोक खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक आणि खळबळ उडवणारी माहिती तपासात समोर आली आहे. अशोक खरात याच्या संपर्कात दररोज ४० ते ४५ राजकीय नेते असायचे. खरातच्या मोबाइलमध्ये विशेष कोर्डवर्डने आमदार, खासदार, राजकीय नेते अन् प्रसिद्ध लोकांची नावे सेव्ह असल्याचे समोर आले आहे. या माहितीनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, राजकीय नेत्यांची नावे खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेत विशेष पाहुण्यांमध्ये असल्याचे समोर आले आहे. खरातच्या मुलीच्या लग्नातील पत्रिका सध्या व्हायरल झाली आहे. त्यात शेलार, पाटील, चाकणकर, नार्वेकर यांच्यासह केसरकर यांचे नाव दिसत आहे.

अशोक खरातच्या ४० ते ४५ राजकीय नेते नियमित संपर्कात असल्याची माहिती खात्रालायक सूत्रांनी दिली आहे. भोंदू अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेतही सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची नाव आहेत. खरात यांच्या मुलीच्या लग्नातील पत्रिकेत एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, आशिष शेलार, रूपाली चाकणकर, चंग्रकांत पाटील, दीपक केसरकर यांची नावे असल्याचे समोर आले आहे.

अशोक खरातने राजकीय नेत्यांचे नाव मोबाइलमध्ये विशेष कोडवर्डमध्ये सेव्ह केली आहेत. कोणताही राजकीय निर्णय घेण्यापूर्वी हे राजकीय नेते भोंदू अशोक खरातचा सल्ला घेत असल्याची माहिती मिळाली आहे. निवडणुकीत फॉर्म भरण्यापूर्वी देखील राजकीय नेते अशोक खरातला वेळ आणि तारीख विचारत असल्याची माहिती समोर आली. रकळ ला दोन दिवसांपूर्वीच फॉरेन्सिक टीमकडून क्लोन डाटा अहवाल मिळाला होता. अशोक खरात प्रकरणी रकळ कडून तांत्रिक पुरावे आणि मोबाईल डेटातून नवनवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.

रिंग रोडजवळ कोट्यवधींची जमीन
नाशिक शहरात प्रस्तावित रिंग रोडजवळ खरातकडून कोट्यावधींच्या जमिनीची खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. महसूल विभागातील इन्सायडरमुळे ब्लॅक अँड व्हाईटचा खेळ समोर आला आहे. नाशिक रिंग रोड मार्गाभोवती कॅप्टन खरातचे खरेदी-विक्रीचे भूसाम्राज्य आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

नामांकित डॉक्टर रडारावर
नाशिकमधील काही नामांकित डॉक्टरही एसआयटीच्या तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने अशोक खरात काही गोळ्या औषध देत होता का ? असा संशय व्यक्त केला जातोय. महिलांना संमोहित करण्यासाठी काही मेडिसीनचा वापर केला जात होता का ? हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे. रकळ च्या तपासात आणखी काही गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR