26.2 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeलातूरदलित हत्याकांडाविरोधात आणखी तीव्र आंदोलन करणार 

दलित हत्याकांडाविरोधात आणखी तीव्र आंदोलन करणार 

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील दलित हत्याकांडांच्या घटनांमधील आरोपींविरुद्ध खूनाचे व अट्रोसिटीचे गुन्हे दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच सीआयडीमार्फत चौकशी करुन सदरील खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी व मयत दलित युवक,  विद्याथ व अत्याचारीत युवकांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, आदी मागण्यासाठी ६ ते ८ ऑगस्ट पर्यंत लातूर येथील महात्मा गांधी चौकात सुरु असलेले जबाब दो धरणे आंदोलनाची गुरुवारी सांगता झाली. याप्रसंगी उपस्थित दलित नेत्यांनी दलित हत्याकांड व अत्याचाराच्या विरोधात आक्रमक अशी भाषणे करुन सरकारने याबाबत तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा लवकरच विराट मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सदर भीमसैनिकांच्या धरणे आंदोलनाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.  निवेदन देणा-या शिष्टमंडळात भारतीय बौद्ध महासभेचे एन. यू. बलांडे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव कांबळे, रिपाइं आठवले पक्षाचे नेते चंद्रकांत चिकटे, वंचित बहुजन आघाडीचे सचिन गायकवाड, भिमशक्तीचे मोहन माने, काँग्रेसेचे यशपाल कांबळे, युवा भिम सेनेचे पंकज काटे, प्रा. अनंत लांडगे, भिम आमचे अक्षय धावारे, युथ पँथर संघटनेचे संतोष वाघमारे, प्रताप कांबळे, ब्लू पँथर संघटनेचे साधू गायकवाड आदींसह विविध पक्ष -संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लातूर शहर व जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून विविध ठिकाणी दलित समाजातील युवक, विद्यार्थ्यांना जातीयद्वेषातून लक्ष्य केले जात असून त्यांच्या अमानुषपणे हत्या करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे. प्रामुख्याने लातूर शहरातील एमआयडीसी भागातील जेएसपीएम शिक्षण संस्थेच्या राजमाता जिजाऊ वसतीगृहात इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणा-या बौद्ध समाजातील अरंिवद राजाभाऊ खोपे या १३ वषय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे. त्यासोबतच जिल्ह्यात इतरही घटनांमध्ये अन्याय, अत्याचार झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR