दशनाम गोसावी समाजातर्फे पंचसूत्री सोहळा

लातूर : प्रतिनिधी
दशनाम गोसावी समाज लातूर व गोसावी वुमन्स विंग लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ ऑगस्ट रोजी येथील गांधी मार्केटमधील डॉ. भालचंद्र रक्तपेढी सभागृहात पंचसुत्री सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती धर्मवीर भारती यांनी मंगळवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस व्यंकटेश पुरी, सुरेखा भारती, अलका गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. गोसावी समाजाचा सन १९९६ मध्ये पहिला मेळावा घेण्यात आला होता.  पुढे समाजात विचारमंथन व्हावे, धर्मशिक्षण मिळावे, यासाठी प्रबोधनाचे कार्य अविरतपणे सुरुच आहे. समाजातील महिलांच्या सन्मानासाठी पुरुषांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत, असे नमुद करुन पंचसुत्री सोहळ्याबद्दल माहिती देताना धर्मवीर भारती म्हणाले,  गोसावी समाजातील सेवानिवृत्त ज्येष्ठांचा सन्मान, धर्मप्रचार करणारे हरीभक्त पारायण, किर्तनकारांचा सन्मान हभप महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्तीचे वितरण होणार आहे. गुणवंत विद्यार्थी व पुजापाठ करणा-यांचा सन्मान आणि विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, असा हा पंचसुत्री सोहळा आहे. यावेळी बोलताना सुरेखा भारती म्हणाल्या, गोसावी वुमन्स विंग गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे.
१८ ते ८० वर्षांच्या महिलांचे हे संघटन आहे. दर महिन्याला सामाजिक उपक्रम घेतले जातात. समाजातील मुलींना शैक्षणिक मदत हा मुख्य उद्देश आहे. हळदी-कुंकूसारख्या कार्यक्रमातून समाजातील विधवा महिलांना जाणिवपूर्वक सहभागी करुन घेतले जाते. महिला स्वावलंबी कशा बनतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गरजू महिलांना आवश्यक ती मदत देण्याचेही प्रयत्न केले जात आहेत. प्रारंभी व्यंकटेश पुरी यांनी प्रास्ताविक करताना दशनाम गोसावी समाजाचा इतिहास नमुद करताना दशनाम गोसावी समाजाने देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी ऐतिहासिक आणि अतुलनीय योगदान दिले आहे. हा गौरवशाली इतिहास डोळ्यांसमोर ठेवूनच, समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि पुढील पिढीला सक्षम करण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news