16.8 C
Latur
Saturday, December 6, 2025
Homeमहाराष्ट्रदहावी पास वित्तमंत्र्यांमुळेच महाराष्ट्राची विल्हेवाट

दहावी पास वित्तमंत्र्यांमुळेच महाराष्ट्राची विल्हेवाट

मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कंत्राटदार खत्री याने सिंचन घोटाळ्यातून पैसा कमावला आहे. त्यातून त्याने वांद्रे येथे स्वत:च्या मुलाच्या नावाने प्रॉपर्टी बनविल्या आहेत. या लोकांमुळेच राज्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. ज्या दिवशी अशा लोकांना शिक्षा होईल, तेव्हा महाराष्ट्र कर्जातून मोकळा होईल. परंतु, दहावी पास वित्तमंत्र्यांच्या डोक्यामुळेच महाराष्ट्राची विल्हेवाट लागली आहे, अशी थेट टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली.

पुणे जिल्ह्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पार्थ पवार यांच्यावर तक्रार दाखल करून घेण्याबाबत दिरंगाई होत आहे. हे मी आता खपवून घेणार नाही, असा इशारा देत याबाबतीतील सर्व कायदेशीर वस्तुस्थिती मी खारगे समितीसमोर मांडली आहे. त्यामुळे आतापर्यंत सिंचन घोटाळा, साखर कारखाना, बँक घोटाळ्याच्या चौकशीमध्ये अजित पवारांचे नाव आले नाही तसेच या प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव पुढे येत नाही, असा आरोपही दमानिया यांनी यावेळी केला.

मुंबईतील अनेक जमिनींची पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी शीतल तेजवानी यांच्याकडे असल्याचा दावा दमानिया यांनी केला. शीतल हिने अनेक ठिकाणी व्यवहार करण्याचा प्रयत्न केला असून, त्याची माहिती आपण आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांकडे दिली असल्याचे सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR