दहा दिवसांत २९ लाख ७७ हजार ६७० भाविकांची केली आरोग्य तपासणी

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमातून राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ५३ हजार ८६२ आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये दहा दिवसांत सुमारे २९ लाख ७७ हजार ६७० भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य विभाग, शासकीय व निमशासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक गणेश मंडळे आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य आणि लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांपासून महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे घेण्यात आली. त्यामुळे भाविकांना घराजवळच प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा मिळाली.

भाविकांना आरोग्य तपासणीसाठी दूर जावे लागू नये आणि आजारांचे वेळेत निदान व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. शिबिरांमध्ये हृदयरोग, किडनीविकार, कर्करोग, मधुमेह, संसर्गजन्य आजार, मेंदूचे गंभीर आजार, बालरोग यांसह विविध आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या भाविकांना पुढील तपासणी व उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर तसेच संबंधित रुग्णालयांकडे पाठविण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, शहरी आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य यंत्रणा तसेच धर्मादाय रुग्णालयांतील डॉक्टर व आरोग्य कर्मचा-यांचे सहकार्य या उपक्रमाला मिळाले. पुढील उपचारांची गरज असलेल्या पात्र रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच इतर संबंधित शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

विभागनिहाय आकडेवारी
विदर्भात ९ हजार ८३४ शिबिरांमध्ये ५ लाख ९४ हजार ६३६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मराठवाड्यात ७ हजार ६३१ शिबिरांमध्ये ४ लाख ५६ हजार ८६३, ठाणे-पालघर भागात ६ हजार १७ शिबिरांमध्ये ३ लाख १७०, कोकणात ३ हजार २४९ शिबिरांमध्ये १ लाख ३७ हजार १४८, उत्तर महाराष्ट्रात ५ हजार ८३८ शिबिरांमध्ये २ लाख ८८ हजार ९४०, तर पश्चिम महाराष्ट्रात १२ हजार ४२४ शिबिरांमध्ये ७ लाख ६६ हजार ७६२ भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर, पुढील उपचारासाठी पाठविण्यात आलेले संदर्भित रुग्ण ५ हजार ९९३ आहेत.

सलग दुस-या वर्षी ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला यंदा दुस-या वर्षी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा देण्यात आली. ३६ जिल्ह्यांमध्ये ५३ हजारांहून अधिक शिबिरांत सुमारे २९ लाखांपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी झाली. आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या नागरिकांना पुढील तपासणी व उपचारासाठी योग्य ठिकाणी पाठविण्यात आले. विविध यंत्रणा, गणेश मंडळे, सामाजिक संस्था आणि आरोग्य कर्मचा-यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविता आला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41
Video thumbnail
शिक्षक द्या, नाहीतर कार्यालयातच शाळा! शिरूर अनंतपाळमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन
02:56
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03

Latest news