नाशिक : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यामुळे नाशिकमधील राष्ट्रवादीच्या एका पदाधिका-याचा मृत्यू झाला. अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि पदाधिकारी सुदाम बोडके यांचे हृदविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अजित पवारांच्या निधनाचे वृत्त ऐकून सुदाम बोडके यांना मोठा धक्का बसला होता. ते खूपच अस्वस्थ झाले होते. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.
नाशिक जिल्ह्यातून ही दु:खद घटना समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर तीव्र धक्का बसल्याने त्यांच्या एका कट्टर समर्थकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावातील ही घटना आहे. ढकांबे गावचे रहिवासी ६३ वर्षीय सुदाम बोडके यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुदाम बोडके हे आपल्या एका मित्राच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. तिथून परत येत असताना त्यांना अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळाली. ही बातमी समजताच त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

