Homeमहाराष्ट्रदानवेंच्या उमेदवारीने राजकारणात खळबळ

दानवेंच्या उमेदवारीने राजकारणात खळबळ

आता राऊतांनी ट्वीट करून निकाल लावून टाकला

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे सध्या राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपाने नुकतेच आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपाने यावेळी नव्या चेह-यांना संधी दिली आहे दुसरीकडे महाविकास आघाडीकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच उमेदवारी अर्ज दाखल करावा, यासाठी प्रयत्न केला जात होता.

शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे पाटील, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्यक्ष ठाकरे यांनीच उमेदवार राहावे यासाठी प्रयत्न केले होते. परंतु आता ठाकरे गटाने ऐनवेळी विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेत अंबादास दावने यांना तिकीट दिले आहे. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी एक ट्वीट केले आहे.

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आमच्या पक्षाकडून तसेच महाविकास आघाडीचे विधानपरिषदेच्या निवडणुकीचे उमेदवार अंबादस दानवे हेच असतील, असे जाहीर केले. त्यानंतर लगेच संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडियावर एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी अंबादास दानवे यांच्या उमेदवारीविषयी भाष्य केले. ‘अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील. उद्या ११ वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली आहे,’ असे संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा होताच काँग्रेसने आपली वेगळी चूल मांडण्याची भूमिका घेतली आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेने अंबादास दानवे यांना तिकीट दिले असले तर आम्ही काँग्रेसकडून आमचा उमेदवार देणार आहोत. पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून आम्ही त्याबाबत निर्णय घेऊ, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार? महाविकास आघाडीत काँग्रेसची मनधरणी कशी केली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR