22.6 C
Latur
Sunday, December 14, 2025
Homeलातूरदामिनी पथकाने केली ५२ टवाळखोरांवर कारवाई 

दामिनी पथकाने केली ५२ टवाळखोरांवर कारवाई 

लातूर : प्रतिनिधी
शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात घिरट्या मारुन रोडरोमिओगिरी करणा-या टवाळखोरांवर दामिनी पथकाच्या वतीने दि. ८ नोव्हेंबर रोजी कारवाई करण्यात आली. लातूर शहर पोलीस उपअधिक्षक कार्यालयाचे दामिनी पथक दक्ष झाले असून या पथकाने आत्तापर्यंत ५२ टवाळखोरांवर कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक अमोत तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी आपल्या कार्यालयांतर्गत दामिनी पथक नेमले आहे. एक महिला पोलीस अधिकारी, ६ पोलीस अंमलदारांचा दामिनी पथकात समावेश आहे. या पथकाने शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात टवाळखोरी करणा-या ५२ जणांवर एक महिन्यात कारवाई केली आहे. शनिवारी आणखी एका टवाळखोरावर कारवाई करण्यात आली.  शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी मुली, महिलांना टवाळखोरांकडून त्रास होत असल्यास दामिनी पथकाच्या मोबाईल क्रमांक ८८३०११५४०९ यावर संपर्क करावा. तक्रार देणा-यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन दामिनी पथकाने केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR