चेन्नई : आयपीएलचा सामना एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जमध्ये रंगला. या सामन्याची नाणेफेक पंजाब संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने जिंकली. श्रेयसने चेपॉकमध्ये प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २०९ धावा केल्या. त्यानंतर जोरदार फटकेबाजी करीत पंजाबच्या फलंदाजांनी १९ व्या षटकातच २१० धावा काढत ५ विकेट्सने सामना जिंकला. चेन्नईचा सलग दुस-यांदा पराभव झाला.
आयपीएल २०२६ च्या सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा पराभव झाला. मात्र, पंजाबची विजयी घोडदौड सुरू असून, आज त्यांचा दुसरा विजय झाला.

