21.6 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeराष्ट्रीयदिल्लीत ५०% कर्मचा-यांना आजपासून वर्क फ्रॉम होम! बांधकाम मजुरांना मिळणार १० हजार

दिल्लीत ५०% कर्मचा-यांना आजपासून वर्क फ्रॉम होम! बांधकाम मजुरांना मिळणार १० हजार

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राजधानी दिल्लीत वाढत्या प्रदूषणाचे भीषण संकट लक्षात घेता राज्य सरकारने मोठी पाऊले उचलली आहेत. दिल्लीत यापुढे बीएस-६ पेक्षा कमी स्टँडर्डच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्याशिवाय कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयात ५० टक्क्यांपर्यंत कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होम बंधनकारक करण्यात आले आहे. सोबतच राज्य सरकारने बांधकाम क्षेत्रात काम ठप्प झाल्याने परिणाम झालेल्या सर्व मजुरांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार देण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत १६ दिवसांसाठी बांधकामे थांबवण्यात आली आहेत. अनेक कामे ठप्प झाल्याने मजुरांवर संकट ओढवले आहे. त्यामुळे सर्व नोंदणीकृत मजुरांच्या खात्यावर १० हजार पाठवण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला आहे.

तथापि, या नियमातून काही क्षेत्रांना वगळण्यात आले आहे. ज्यात हॉस्पिटल, अग्निशमक दल, कारागृह प्रशासन, सार्वजनिक परिवहन, इलेक्ट्रिसिटी, पाणी पुरवठा-आपत्कालीन विभाग, महापालिका सेवा यासारख्या विभागांचा समावेश आहे. सोबतच दिल्लीत कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात यावा असे आवाहन दिल्ली सरकारकडून कंपन्यांना करण्यात येत आहे.

दिल्लीला निकृष्ट हवेचा फटका
दिल्लीत एअर क्वॉलिटी इंडेक्स बुधवारी ३२९ वर अत्यंत खराब कॅटेगिरीत समाविष्ट झाली आहे. मागील ३ दिवसांपासून राजधानीत गंभीर हवा प्रदूषणातून काहीसा दिलासा मिळाला. काही परिसर आजही प्रदूषित आहेत. दाट धुक्यामुळे विमान आणि वाहतूक सेवा कोलमडली आहे. याठिकाणी रस्ते अपघात हे प्रमुख कारण बनत आहे. वाढत्या हवा प्रदूषणामुळे दिल्ली सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR