13.7 C
Latur
Friday, November 14, 2025
Homeलातूरदिवाळीनिमित्त परप्रांतीय विद्यार्थ्यांसाठी स्नेहमिलन

दिवाळीनिमित्त परप्रांतीय विद्यार्थ्यांसाठी स्नेहमिलन

लातूर : प्रतिनिधी
येथील कृषि महाविद्यालयात देशाच्या विविध प्रांतांमधून विद्यार्थी कृषि शिक्षण व संशोधनासाठी येतात. परंतु दिवाळीसारख्या सणांमध्ये अनेक विद्यार्थी घरी जाऊ शकत नाहीत आणि आपल्या कुटुंबियांसोबत उत्सव साजरा करण्याची संधी त्यांना मिळत नाही. या पार्श्वभूमीवर कृषि महाविद्यालयातर्फे तसेच कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठान, उंदरी, साई प्रात:चल चमू, लातूर, रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रो, लातूर आणि एडीएम अग्रो इंडस्ट्रीज, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने परप्रांतीय विद्यार्थ्यांसाठी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी परभणीचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये माजी प्राचार्य डॉ. बाळासाहेब चव्हाण, अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्राचार्य डॉ. अंगद सूर्यवंशी, पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे, डॉ. प्रा. विनोद चव्हाण तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी पोलीस अधिकारी सय्यद रहेमान यांचा समावेश होता.
यावेळी बोलताना डॉ. ढवण, डॉ. बाळासाहेब चव्हाण, डॉ. अंगद सूर्यवंशी, डॉ. संतोष कांबळे, सय्यद रहेमान, साई प्रात:चल चमूचे शिवाजी गिरी, कुणाल घुंगार्डे,  रोटरी क्लबचे धनराज बिरादार, कालिदास लांडगे आणि गंगाधर गवळी, आणि राजेश संन्यासी, अनुराधा सूर्यवंशी, ठोंबरे यांनीही विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. विद्यार्थिनी ब्युटी दाई आणि निर्मल कुमार यांनी कार्यक्रमाबद्दल  कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन डॉ. विजय भामरे यांनी केले, तर आभार डॉ. अनिलकुमार कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अनंत शिंदे, डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. प्रभाकर अडसूळ,  सुधीर सूर्यवंशी आणि मीना साठे यांनी परिश्रम घेतले. या स्नेहमिलनात महाराष्ट्रातील तसेच परप्रांतीय विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले आणि एकत्रितपणे दीपावलीचा आनंद लुटला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR