दिशा प्रतिष्ठानने दिली ३ लाखांहून अधिक रुग्णांना आरोग्यसेवा

लातूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील नागरिकांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिशा प्रतिष्ठान, लातूर संचलित ‘फिरता दवाखाना’ या उपक्रमाने यशस्वीपणे ६ वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. ‘एक पाऊल माणुसकीचे-निरोगी आरोग्याचे!’ या ब्रीदवाक्याखाली सुरू असलेल्या या उपक्रमाला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या ६ वर्षांत दिशा प्रतिष्ठानने ३ लाखांहून अधिक रुग्णांना आरोग्यसेवा दिली.
दिशा प्रतिष्ठानतर्फे शिक्षणासोबतच आरोग्य क्षेत्रातही सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली जात आहे. फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांतील १३२ हून अधिक गावांमध्ये आरोग्यसेवा पोहोचविण्यात आली आहे. आजपर्यंत ३ लाखांहून अधिक रुग्णांची प्राथमिक तपासणी व उपचार करण्यात आले असून, गरजूंना तज्ज्ञ डॉक्टरांकडे पुढील उपचारासाठी मार्गदर्शन व संदर्भही देण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत रक्तदाब, मधुमेह, प्राथमिक आरोग्य तपासणी, आवश्यक औषधांचे वितरण तसेच पुढील उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला जातो. या सेवेमुळे ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांची सुमारे ३० कोटी रुपयांची बचत झाली असावी असा विश्वास दिशा प्रतिष्ठानने केला आहे. ग्रामीण भागातील गरीब व गरजू नागरिकांना वेळेवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम आज अनेक कुटुंबांसाठी आधारवड ठरला आहे. आरोग्यसेवेबरोबरच समाजात सेवाभाव आणि माणुसकीची भावना जोपासण्याचे काम दिशा प्रतिष्ठान सातत्याने करत असल्याचे संस्थेच्या पदाधिका-यांनी सांगितले. फिरत्या दवाखान्याच्या सहा वर्षांच्या यशस्वी प्रवासात सहकार्य करणारे डॉक्टर, दानशूर व्यक्ती, स्वयंसेवक, ग्रामस्थ आणि सर्व हितचिंतकांचे दिशा प्रतिष्ठानने आभार मानले असून, आगामी काळात ही सेवा अधिक व्यापक करण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21

Latest news