लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या आडत बाजारात आडत्यांकडे शेतमाल विक्रीसाठी आल्यानंतर व्यापारी सौदा करून शेतमाल खरेदी करतात. पण एका व्यापा-याने तीन वर्षापूर्वी सोयाबीन, तूर, हरभरा खरेदी केला, आडत्यांना वेळेत पैसे दिले नाहीत. पाठपुरावा करूनही साडेपाच कोटी पैकी दीड कोटी रूपये येणे बाकी आहेत. ३५ आडत्यांचे दीड कोटी रूपये तीन वर्षापासून थकीत असल्याने त्यांनी सोमवार पासून बाजार समितीच्या प्रवेश द्वारात धरणे आंदोलन सुरू केले आहे.
गगण हरिप्रसाद मालपाणी या व्यापा-याकडे आडत्यांचे शेती विक्री मालाचे मागील मागील तिन वर्षापासुन पेमेंट थकीत आसून वारंवार मागणी करूनही आनखीन पेमेंट मिळाले नाही. त्यामुळे आडत्यांनी साखळी उपोषणास सोमवारपासून लातूर बाजार समितीच्या बाजार आवारामध्ये शिवनेरी गेट समोर सकाळी ११ वाजल्यापासून बसले आहेत. आडत आसोशिएशनच्या माध्यमातून बाजार समितीकडे पैशाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत पाठपुरावा होत आहे. त्यानुसार बाजार समितीही सर्वांना सहकार्य करत आहे. गगण हरिप्रसाद मालपाणी या व्यापा-याकडील थकीत रक्कम द्यावी म्हणून आडते आंदोलन करत आहेत. तसेच आडत्यांच्या बरोबरच शेत-यांचाही शेतमाल गगन मालपाणी यांनी थेट खरेदी केला आहे. त्यांचेही सोयाबीन विक्रीचे पैसे थकीत आहेत. त्यामुळे सदर शेतक-यांनीही या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
















