दुचाकीचा स्फोट; महिला गंभीर

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील एका इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होऊन शेजारीच बसलेली एक वृद्ध महिला गंभीर भाजली आहे. या घटनेनंतर आजूबाजूला उपिस्थत असलेल्या नागरिकांनी वृद्ध महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या वृद्ध महिलेचे नाव मुक्ताबाई सर्जेराव पिवळ असे आहे. सदर घटना ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या आडूळ येथील बसस्थानक परिसरातील बॅटरीच्या दुकानात घडली आहे. आडूळ बसस्थानकावर शुभम उत्तमराव पिवळ यांच्या मालकीचे बॅटरी दुरुस्ती व खरेदी-विक्रीचे दुकान आहे. या दुकानात शुभम यांनी एका इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी काढून दुकानात चार्जिंगला लावली. यानंतर ते जेवण करायला बसले.

यावेळी दुकानात मुक्ताबाई पिवळ या बाजूला बसलेल्या होत्या. याचवेळी चार्जिंगला लावलेल्या बॅटरीचा जोरदार स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटात मुक्ताबाई गंभीर जखमी झाल्या. स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी शुभम यांच्या दुकानात धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या मुक्ताबाई यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान मुक्ताबाई पिवळ यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. ही घटना घडताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. तुम्हीदेखील अशा प्रकारच्या चार्जिंगवरील दुचाकी वापरत असाल तर काळजीपूर्वक वापरा आणि अशा घटनांपासून सावध राहा.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40

Latest news