Homeलातूरदुचाकीमध्ये बसलेल्या नागाला सर्पमित्रांनी दिले जीवदान

दुचाकीमध्ये बसलेल्या नागाला सर्पमित्रांनी दिले जीवदान

चाकूर : प्रतिनिधी
तालुक्यातील मांडूरकी या गावात इस्माईल पठाण यांच्या दुचाकीमध्ये साप गेल्याचे दिसून आले. त्यांनी ताबडतोब सर्पमित्र शिरूरकर, अल्ताफ सय्यद व शुभम भातके यांना संपर्क साधला. याची माहिती मिळताच शिरूरकर ग्रुपची टीम त्या ठिकाणी पोहचून शिताफीने या अतिविषारी नागास बाहेर काढून त्यास निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे साप थंड वातावरणाच्या शोधात घराभोवती आढळून येतात. नाग हा अतिविषारी आहे. लातूर जिल्ह्यात प्रामुख्याने ४ प्रजातींचे साप आढळून येतात. नाग, मन्यार, फुरसे, घोणस. नाग आणि मन्यारमध्ये निरोटॉक्सिक विष असते. या सापाने चावा घेतल्यास मानवी शरीरावर माणसाच्या मेंदूवर व हृदयावर परिणाम होतो. माणसाची शुद्ध हरवू शकते. तसेच फुरसे व घोणस या सापाने चावा घेतल्यास माणसाच्या किडनीवर व रक्तावर परिणाम होतो. रक्ताच्या गाठी तयार होऊन रक्त पुरवठा बंद होतो. बिनविषारीमध्ये कवड्या, धामण, दिवड, गवत्या, अजगर, नाणेटी, कुकरी तस्कर, रुखई, डूरक्या घोणस, वाळा धूळनागीण हे साप आपल्या भागात आढळून येतात.

दुर्दैवाने सर्पदंश झाल्यास कोणत्याही बाबा बुवा, झाड पाला न करता प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणे गरजेचे आहे. गेल्या बारा वर्षांपासून वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी लातूर अंतर्गत सर्पमित्र शिरूरकर ग्रुपच्या माध्यमातून चाकूर, अहमदपूर, जळकोट तालुक्यात सर्पमित्र अमोल शिरूरकर, गोरख खेडकर, दयानंद हाक्के, दिपक जाधव, गणेश कोल्हे, सोहेल शेख, अनवर पठाण हे सर्व सर्पमित्र वन्यजीव वाचविण्याचे काम शासनाचा कसलाही मोबदला न घेता करीत आहेत. आपल्या परिसरात साप अथवा जखमी पशु प्राणी आढळून आल्यास त्याला न मारता न घाबरता आमच्या सर्पमत्रि शिरूरकर ग्रुपच्या हेल्पलाईन क्र :-७७०९७७९७९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्र शिरूरकर ग्रुपचे अध्यक्ष अमोल शिरूरकर यांनी केले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR