22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeदुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

मरीना : वृत्तसंस्था
दुबईतील मरीना येथील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग लागली. या इमारतीमधील ३८०० हून अधिक रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून या आगीत कोणीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नसल्याचे अधिका-यांनी सांगितले.

टायगर टॉवर म्हणून ही इमारत ओळखली जात होती. शनिवारी पहाटे ही आग लागली. दुबई सिव्हिल डिफेन्स टीमने आग आटोक्यात आणण्यासाठी सहा तास प्रयत्न केले. या इमारतीमध्ये ७६४ अपार्टमेंट आहेत, त्यातील ३,८२० रहिवाशांना बाहेर काढण्यास यश आले. एवढ्या मोठ्या इमारतीत आग लागल्याचे बहुतांश रहिवाशांना समजले देखील नाही, झोपेत असल्याने ते आग लागल्याच्या घटनेपासून अज्ञात होते.

आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. महत्वाचे म्हणजे या इमारतीला आग लागण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०१५ मध्ये, ४७ व्या मजल्यावरील स्वयंपाकघरातील आग ४८ व्या मजल्यावर पसरली होती. तसेच २०१७ मध्येही या इमारतीत आग लागली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR