दुष्काळग्रस्त भागात फिरण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांची भेट घ्या; विधान परिषद सदस्य अंबादास दानवे यांचा सत्ताधारी आमदारांना टोला

परभणी : मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये अत्यल्प पावसामुळे पिकांचे नुकसान आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी आमदारांनी दुष्काळग्रस्त भागात दौरे करून केवळ पाहणी करण्यापेक्षा थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करावी. शेतक-यांच्या प्रश्नावर तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उबाठाचे नेते आ. अंबादास दानवे यांनी दिला आहे.

उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रविवार, दि.१३ सप्टेंबर रोजी आयोजित मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा अभियानासाठी आ. दानवे परभणीत आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत आ. दानवे यांनी सत्ताधारी आमदारांवर जोरदार टिका केली. यावेळी परभणी लोकसभा संपर्क प्रमुख प्रदीपकुमार खोपडे, आ. डॉ. राहुल पाटील, महानगर प्रमुख डॉ. विवेक नावंदर, माजी आ. मिराताई रेंगे पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, रविंद्र धर्मे, अरविंद काका देशमुख आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आ. दानवे म्हणाले की, दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे दौरे आणि पाहणीमुळे शेतक-यांच्या समस्या सुटणार नाहीत. सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठवाड्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी करावी, असे मत व्यक्त केले. मराठवाड्यातील शेतकरी पावसाच्या लहरीपणामुळे अडचणीत आला आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून काही भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पंचनामे करून शेतक-यांना आर्थिक मदत, पीकविमा आणि इतर आवश्यक सवलती उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आ. दानवे यांनी यावेळी केली.

राज्याच्या विकासात मराठवाड्याचा मोठा वाटा असतानाही या भागातील शेतकरी, पाणी, सिंचन, रोजगार आणि दुष्काळाच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने दखल घेऊन विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली. शेतक-यांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आगामी काळात या प्रश्नावर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दुष्काळग्रस्त भागातील जनतेला केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष मदत आणि ठोस निर्णय अपेक्षित आहेत, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41

Latest news