लातूर : प्रतिनिधी
येथील कार्निवल रिसोर्ट येथे दि. ८ फेब्रुवारी रोजी दुसरी विभागीय श्वसन विकार परिषद थाटात झाली. या परिषदेत मराठवाड्यातील व राज्यातील विविध जिल्ह्यातील फिजीशियन, चेस्ट फिजिशियन व अतिदक्षता विभागात कार्यरत असलेले डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिषदेत दमा, दुर्धर दमा, एलर्जी, टीबी, हृदय विकार, लंग कॅन्सर, आयएलडी, पान टीबी, अशा जटील व गंभीर आजारावर चर्चा झाली. या परिषदेचे उद्घाटन आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी व अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. संतोष कुलकर्णी यांनी अश्या प्रकारची परिषद आयोजित केल्या बद्दल अभिनंदन केले. अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी श्वसनविकार व हृदय विकार या मूळे मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले.
या परिषदेत जवळ जवळ ४०० डॉक्टर सहभागी झाले होते. या परिषदेत डॉ. रमेश भराटे, डॉ. नागार्जुन मातारू, विपुल गर्ग, यांच्यासह अनेक प्रमुख डॉ.ॅ यांनी मार्गदर्शन केले. लातूर येथे ही परिषद डॉ. रमेश भराटे यांनी आयोजित करून एक प्रकारे वैद्यकीय क्षेत्राची मान उंचावली आहे. त्यांचे या बद्दल कौतुक करण्यात येत आहे. ही परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. भराटे, डॉ. अशोक गानू, डॉ. राजेश पाटील, डॉ. तोषणीवाल, डॉ. कानडे, डॉ. चौधरी, डॉ. शीतल, डॉ. गणेश यांचे सहकार्य लाभले.

