लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या तिस-या सार्वत्रिक निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सूरु आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुस-या दिवशी दि. २४ डिसेंबर रोजी एकुण ३४९ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली आहे. दोन दिवसांत एकुण ५१३ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली असून अद्याप एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही.
शहरातील प्रभाग क्रमांक १, २, ३ या प्रभागांमधून ७० नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली. ४, ५, ६ या प्रभागांतून ४१ नामनिर्देशनपत्र, ७, ८, ९ या प्रभागांतून ३९ नामनिर्देशनपत्र, १०, ११, १२ या प्रभागांतून ५६ नामनिर्देशनपत्र, १३, १४, १५ या प्रभागांतून ९८ नामनिर्देशनपत्र तर १६, १७, १८ या प्रभागांतून ६५, असे एकुण ३६९ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली. पहिल्या दिवशी १४४ आणि दुस-या दिवशी ३६९ असे एकुण ५१३ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली असून अद्याप एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. दि. ३० डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत. लातूर शहर महानगरपालिका निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडे इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे. सर्वच इच्छुक प्रभागात नागरीकांशी संपर्कात आहेत.

