लातूर : प्रतिनिधी
बीयॉंड व्हीजन फाउंडेशन, लातूर, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, अॅड. धनंजय चिताडे परिवार मित्र मंडळ, अॅड. विक्रम पाटील चाकूरकर, लातूर शहरातील दानशूर व्यक्ती व संस्था यांच्या सक्रीय मार्गदर्शन आणि आर्थिक सहकार्यातून महाराष्ट्र राज्यातील १५ जिल्ह्यातील अत्यल्प उत्पन्न गटातील ७० दृष्टी दिव्यांग व्यक्तींसाठी ओमकारेश्वर, उज्जैन, सिहोर, चित्रकूट, अयोध्या, काशी, प्रयागराज, माहूर व माळेगाव येथील देव, देवतांच्या दर्शणार्थ ९ दिवसीय लातूर-अयोध्या-लातूर दिव्यदृष्टी सहलीचे आयोजन दि. २७ मे ते ४ जून या कालावधीत करण्यात आले होते.
या सहलीचा उद्घाटन समारंभ दि. २७ मे रोजी डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, रोटरी डीस्ट्रीक्ट ३१३२ चे प्रांतपाल सुधीर लातूरे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, लक्ष्मीकांत कर्वा, श्रीमती गंगाबाई व्यंकटराव चिताडे, विक्रम पाटील चाकूरकर, सुनील ओझा, राजेश मित्तल, डॉ. शांतीलाल शर्मा यांच्या प्रमुख उपस्थीतीत येथील अंबाजोगाई रोडवरील हॉटेल पार्थ येथे झाला.
लातूरहून निघालेल्या या सहलीतील सर्व दिव्यांग दर्शणार्थ्यांनी २८ मे रोजी मामलेश्वर व त्यानंतर नर्मदा नदीचा घाट पार करून श्री. ओमकारेश्वर भगवानाचे, दि. २९ म रोजी उज्जैन येथे पहील्यांदा काल भैरव व त्यानंतर श्री. महाकालेश्वर भगवानाचे, त्याच दिवशी संध्याकाळी सिहोर येथे कुब्रेश्वर धाम येथे श्री कुब्रेश्वर भगवानाचे, दि. ३० मे रोजी चीत्रकूट येथे मंदाकीनी नदीचे विविध घाट, राम-भरत भेट, हनुमान धारा आदि मंदीरांना भेट देऊन तेथील देव देवतांचे दर्शन, दि. ३१ मे रोजी अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी येथील मंदिरात श्री. राम लल्लांचे दर्शन, हनुमान गडी दर्शन, दशरथ महल दर्शन, संध्याकाळी सात वाजता शरयू आरती, दि. १ जून रोजी काशी विश्वनाथ भगवानाचे दर्शन, संध्याकाळी सात वाजताची गंगा आरती, दि. २ जून रोजी पर्याग राज येथे जाऊन त्रिवेणी संगमावर गंगास्नान, दि. ३ जून रोजी नागपूर वानाडोंगरी नागलवाडी स्थित श्री. गजानन महाराजाचे, दि. ४ जून रोजी माहूरगड येथे अनुसया माता, रेणुका माता, श्री. दत्तात्रय व शेवटी माळेगाव येथे श्री. खंडोबाचे दर्शन मोठ्या उत्साहाने व भक्ती भावाने घेतले. या सहलीच्या यशस्वीतेसाठी डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, बीयॉंड व्हीजन फाउंडेशन, लातूरचे अध्यक्ष डॉ. माधव गोरे, सचीव संदीप चोपडे, कोषाध्यक्षा मीरा चोपडे, अॅड. धनंजय चिताडे, अॅड. विक्रम पाटील चाकूरकर, सुनील ओझा, प्रविण मीटकरी, किशोर ससाने, शहरातील दानशूर व्यक्ती व संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
















