ठाणे : प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवीन राजकीय समीकरणांना मोठा वेग आला आहे. त्यातच ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत’ अशा आशयाच्या बॅनरची राज्यभरात चर्चा सुरू आहे. त्यापूर्वी या बॅनरवर अजून एक ओळ आहे. त्यावरून एकूणच हा प्रकार काय हे समोर येते. दोन मराठी वाघांनी एकत्र येणे ही महाराष्ट्राची इच्छा आहे, असा मजकूर ठळकपणे त्यावर नोंदवण्यात आला आहे. हे बॅनर मंत्री नितेश राणे यांना डिवचण्यासाठी लावण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून मनसे-शिवसेना युतीचे गु-हाळ सुरू आहे. दोघांकडून सकारात्मक चर्चा सुरू आहे. तर सत्ताधारी गोटातून पण त्यावर खडाजंगी सुरू आहे.
दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी राज्य दणाणून गेले आहे. दोन वाघ एकत्र येणार असे दोन्हीकडील कार्यकर्ते, पदाधिकारी सांगत आहेत.
चर्चेच्या गु-हाळातून अजून गोडव्याची भेली मात्र बाहेर आलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी संदेश नाही तर थेट बातमी देणार असा सांगावा देऊनही आता पाच दिवस उलटले आहेत. सगळेच जण त्या बातमीची आतुरतेने वाट पाहत आहेत. इकडे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नवीन राजकीय समीकरणांना मोठा वेग आला आहे. त्यातच एका बॅनरची राज्यभर चर्चा सुरू आहे.
‘देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत’ अशा आशयाच्या या बॅनरची राज्यभरात चर्चा सुरू आहे. त्यापूर्वी या बॅनरवर अजून एक ओळ आहे. त्यावरून एकूणच हा प्रकार काय हे समोर येते.