बंगळुरू : वृत्तसंस्था
कर्नाटक उच्च न्यायालयाने जनता दल (एस)चे माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला बलात्कार आणि लैंगिक छळाच्या प्रकरणात मोठा धक्का दिला. न्यायालयाने या प्रकरणात रेवण्णाला दोषी ठरवले. न्यायालयाने दोषी ठरवल्याचा निर्णय देताच, रेवण्णा न्यायालयातच ढसाढसा रडू लागल्याचे सांगितले जाते.
माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला सेक्स टेप प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाकडून उद्या (शनिवारी) त्याला शिक्षा जाहीर केली जाणार आहे. प्रज्ज्वल रेवण्णा हा देशाचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आहे.
प्रज्ज्वल रेवण्णावर लैंगिक छळाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. याशिवाय त्याच्यावर अनेक महिलांवर बलात्कार केल्याचाही आरोप आहे. प्रज्ज्वल रेवण्णा याच्यावरील आरोपांमुळे जेडीएसने त्याला पक्षातून निलंबितही केले होते. प्रज्वल रेवण्णावर लैंगिक छळाचे अनेक गुन्हे दाखल झाले. यासोबतच त्याच्यावर अनेक महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. प्रकरण अधिकच बिकट होत असल्याचे पाहून चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली. तपासानंतर प्रज्ज्वलवर बलात्कार, विनयभंग, ब्लॅकमेलिंग आणि धमकी देण्याचे आरोप असलेले ३ गुन्हे दाखल करण्यात आले होते. महिलांवर बलात्कार केल्यानंतर रेवण्णा त्यांना सरकारी नोकरीची ऑफर देत असे.

