24.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeदेशात प्रथमच भोपाळमध्ये पेपरलेस मतदान!

देशात प्रथमच भोपाळमध्ये पेपरलेस मतदान!

भोपाळ : वृत्तसंस्था
मध्य प्रदेश राज्य निवडणूक आयोगाने भोपाळ जिल्ह्यात झालेल्या पंचायत पोटनिवडणुकीच्या मतदान केंद्रावर पेपरलेस मतदान यशस्वीरीत्या पार पाडले. या मतदान केंद्रावर ८४ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव अभिषेक सिंह यांनी सांगितले की, आयोगाने देशात प्रथमच रतुआ रतनपूर ग्रामपंचायतीच्या २९५ मतदान केंद्रांवर पेपरलेस मतदान केले. या यशस्वी प्रयोगाच्या पार्श्वभूमीवर पंचायत आणि नगरपालिकांमध्ये पारदर्शक मतदान करण्यासाठी पेपरलेस मतदान केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पेपरलेस मतदान केंद्रे तयार करून फॉर्म डिजिटल केले जात आहेत. रतुआ रतनपूरमध्ये पहिल्यांदाच याचा वापर करण्यात आला. या प्रक्रियेमध्ये मतदारांची ओळख आणि मतदान केले हे कळण्यासाठी स्वाक्ष-या आणि अंगठ्याचे ठसे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रेकॉर्ड केले जातात.

मतदानाची टक्केवारी आणि बॅलेट पेपरचा हिशेबही ऑनलाइन करण्यात आला. दर दोन तासांनी सर्व प्लॅटफॉर्मवर मतदानाच्या टक्केवारीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली. मतदान पूर्ण झाल्यानंतर बॅलेट पेपरबद्दल सर्व माहिती उमेदवार आणि मतदान प्रतिनिधींना त्यांच्या ई-मेल आयडीवर पाठविण्यात आली, असे या अधिका-याने सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR