28 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeमहाराष्ट्रदेशात फक्त भगवाच चालणार

देशात फक्त भगवाच चालणार

सहर शेखवर नवनीत राणांची टीका

नागपूर : नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या अकटकट पक्षाने १२५ जागा जिंकत सर्वांनाच चकीत केले. या विजयानंतर मुंब्रा येथील पक्षाची तरुण नगरसेविका सहर शेख यांनी ‘मुंर्ब्याला हिरवे करुन टाकू’ म्हटल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या विधानावर भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, पाकिस्तानला जावे लागेल, असे विधान केले आहे.

या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या, मुंर्ब्याला पूर्ण हिरवा करायचा असेल, तर पाकिस्तानला जावे लागेल. या देशात भगवाच चालेल. हिरवे करण्याची स्वप्ने पाहणा-यांची स्वप्ने कधीच पूर्ण होणार नाहीत. या देशात आमच्यासारखे कार्यकर्ते आणि भक्त आहेत. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालते. माझ्या रक्तात शिवाजी महाराजांचे विचार आहेत. जोपर्यंत रक्त आहे, तोपर्यंत या देशातून कोणीही भगवा हटवू शकत नाही.

सहर शेख नेमके काय म्हणाल्या होत्या?
सहर शेख यांनी आपल्या विजयानंतर केलेल्या भाषणात म्हटले होते, पाच वर्षांनंतर होणा-या निवडणुकीत विरोधकांना याहीपेक्षा मोठे आणि ठोस उत्तर द्यायचे आहे. संपूर्ण मुंर्ब्याला अशा हिरव्या रंगात रंगवायचे आहे की, ते पूर्णपणे पराभूत होतील. पुढील वेळी प्रत्येक उमेदवार एआयएमआयएमचाच असेल. यावेळी तुम्ही मजलिसची ताकद पाहिली आहे. ही ताकद आम्हाला अल्लाहने दिली आहे. हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR