18.4 C
Latur
Friday, December 5, 2025
Homeमहाराष्ट्रदोन्ही शिवसैनिक आमने-सामने

दोन्ही शिवसैनिक आमने-सामने

उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे वाद रंगला; मुंबईतील घटना

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत पालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर विक्रोळीत श्रेयवादावरून ठाकरे आणि शिंदे यांची शिवसेना आमने-सामने आल्या. उद्धव सेना आणि शिंदे सेना यांची ताकद प्रामुख्याने मुंबई-ठाणे पट्ट्यात असल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही सेनेत वाद रंगल्याच्या घटना घडणार असल्याचे चित्र दिसत आहे.

मुंबईत ८ नोव्हेंबर रोजी विक्रोळीतील महात्मा फुले रुग्णालयावरून आमदार सुनील राऊत आणि एकनाथ शिंदे गटाच्या युवासेनेत संघर्ष निर्माण झाला. विक्रोळीतील महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्बांधणीवरून राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवा सेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. २०१४ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय बंद पडले. स्थानिक नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ५०० बेडचे नवीन रुग्णालय बांधण्याचे आदेश दिले होते.

शिंदे गटाची युवा सेना आक्रमक
गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी रुग्णालयाचे काम सुरू आहे. आठवडाभरापूर्वी स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी येथे येऊन पाहणी केली. त्यानंतर शिंदे गटाची युवा सेना आक्रमक झाली. आज शिंदे गटाच्या युवा सेनेने कन्नमवार नगर परिसरात आंदोलन केले. सुनील राऊत यांचे फोटो लावले. ‘काम शून्य पण श्रेयाचे साम्राज्य’ अशा आशयाचे बॅनर शहरभर लावून आंदोलन केले. आंदोलकांनी काळे कपडे परिधान केले. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचे ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ असे पोस्टर हाती धरले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR